सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने सन २००१ मध्ये हे छोटेसे रोपटे लावले होते. शिस्तबद्ध, पारदर्शी व प्रामाणिक प्रशासनामुळे आज त्याचे कल्पवृक्षात रूपांतर झाले आहे. पतसंस्थेच्या २५ वर्षाच्या आर्थिक वाटचालीमध्ये संस्थेने सातत्याने दैदिप्यमान व गौरवास्पद कार्य केलेले आहे. स्थापनेपासून पतसंस्थेला सलग वाढता नफा, सलग वाढत्या ठेवी, सतत उच्चत्तम ऑडीट गुण व न्युनत्तम थकबाकी आहे. २५ वर्षांपैकी ६ वर्ष 'अ स्टार' तर १९ वर्ष 'अ' ऑडीट वर्ग असलेली आहे. चांदवड तालुक्यातील ही अग्रगण्य असलेली पतसंस्था म्हणून नाव लौकीक आहे. पतसंस्थेचे भव्य कार्यालय असून ते स्वमालकीचे, अद्ययावत व वातानुकूलीत असे आहे.
सभासद केंद्र स्थानी मानून सकारात्मक व सुसंवाद साधून अर्थकारण केल्यामुळे संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. संस्थेमुळे सभासदांचे आर्थिक जीवन उन्नत झालेले असून त्यांचे आर्थिक परिवर्तन झाले आहे. सर्व सभासदांना प्रत्येकी १ लाख रूपये मुल्याचा सरकारी विमा कंपनीचा विमा संरक्षण कवच म्हणून काढला जातो. गेली २५ वर्षापासून अविरोध संचालक मंडळाची परंपरा कायम टिकून आहे. सभासदांना ई-सेवेमार्फत एन.एफ.टी. (NEFT), आर.टी.जी.एस. (RTGS), नेट बँकिंग, एस.एम.एस. (SMS) द्वारे ग्राहकांना सर्व खात्यांची थेट माहिती मिळते. गेली अनेक वर्षापासून संस्थेचा निव्वळ एन.पी.ए. (NPA) शुन्य टक्के आहे हि भूषणावह बाब आहे. संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना पी.एफ., सेवा नियमावली लागू असून दरवर्षी बोनस दिला जातो. संस्थेचे संस्थापक प्रा. निकम टी.पी. हे पूर्ण वेळ संस्थेत बसून आर्थिक व्यवहार बघतात. त्यामुळे संस्थेचे गुणात्मक कामकाज उत्कृष्ट असून दरवर्षी आर्थिक प्रगतीचा आलेख चढता आहे. चांदवड तालुक्यात अनेक नामांकित पतसंस्था आहे, त्यांच्याशी निर्मळपणे स्पर्धा करून, दुष्काळ, आर्थिक मंदी, गारपीट, नोटाबंदी, कोरोना अशा अनेक संकटांना सामोरी जावून संस्थेने उत्कृष्ट कर्ज वसुली व गुणवत्ता राखलेली आहे.
"सहकारातून समृद्धी" हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संस्थापक प्रा. निकम टी. पी. यांनी संस्था सुरू केली. दिनांक २९/०५/२००१ रोजी आपल्या मित्र परिवाराबरोबर "महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड" या नावाने पतसंस्थेची स्थापना केली.
चांदवड तालुक्यातील सततच्या नैसर्गिक संकटांमूळे शेतकरी वर्ग, मजूर, कामगार, कारागिर हे सर्व कर्जात व सावकारांच्या दुष्ट चक्रात अडकलेले होते. त्यांचे हे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी संस्थेची नोंदणी केली. सभासदाकडून फक्त १०० रुपये भाग रक्कम घेवून पतसंस्था सुरु केली. आज रोजी संस्थेचे ३ कोटी २७ लाख रुपये भागभांडवल आहे व खेळते भागभांडवल १२ लाख १९ हजार होते ते आज १४ कोटी ८६ लाख रूपये आहे.