महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड च्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.     |     IMPS / NEFT / RTGS: जलद पैसे पाठवण्याची सुविधा.     |     सामान्य माणसाच्या उन्नत जीवनासाठी, पतसंस्था सदैव तत्पर तुमच्यासाठी...
Slide 1
Slide 2
Slide 3
About
आमच्याबद्दल

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड च्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

चांदवड तालुक्यातील सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून मोलाचे सहकार्य केले. ठेवीदारांच्या व सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतलेली आहे. संस्थने कठीण निकष लावुन कर्जवाटप‚ कर्जवसुली व दैनंदिन कामकाज केले आहे. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणुन संस्थेला सलग 6 वर्षे “अ” तारांकीत तर 18 वर्ष “अ” ऑडिट वर्ग मिळालेला आहे. या वर्षी संस्थेने 24 वर्ष पुर्ण केलेले आहे. 24 वर्षाच्या कालावधीत संस्था स्वयंपुर्ण झालेली असुन आर्थिक दॄष्टया मजबुत आहे. स्वत:च्या मालकीच्या अद्ययावत भव्य नुतन वातानुकूलीत वास्तुत संगणकीकरणासह RTGS,NEFT,IMPS,SMS,QR Code अशा ऑनलाईन आर्थिक सुविधासह सुसज्ज अवस्थेत आज ही संस्था सेवा देत आहे.

सन 2001 रोजी समाजाने लावलेले हे छोटेसे रोपटे आज त्याचे कल्पवॄक्षात रूपांतर झाल्याचा चमत्कार आपण पहात आहोत. चांदवड तालुक्यात अग्रगण्य व शिस्तबध्द‚ प्रभावी प्रशासन असलेली संस्था म्हणून महात्मा फुले नागरी सह.पतसंस्थेची ओळख झालेली आहे. सुरूवातीपासून संस्थेच्या सर्व व्यवहारात नियोजन बध्दता‚ पारदर्शकता‚ तत्परता‚ विश्वासार्हता व आर्थिक शिस्ती बरोबर कार्यालयीन शिस्त राखण्याचे काम संचालक मंडळाने केलेले आहे. ते केवळ आपल्या बहुमोल सहकार्यामुळे शक्य झालेले आहे. संस्थेच्या नेत्रदिपक प्रगतीत आपला सर्वांचा मोलाचा वाटा आहे.चांदवड तालुक्यातील अनेक नामांकित पतसंस्था आहे, त्यांच्याशी निर्मळस्पर्धा करीत आहे. दुष्काळ‚ आर्थिक मंदी‚ गारपीट, नोटबदली, कोरोना अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले होते.अशा मोठया संकटाला सामोरी जावुन संस्थेने दरवर्षी उकॄष्ट कर्जवसुली केलेली आहे. संस्थेने गरजु व होतकरू तरूणांना‚ सभासदांना‚ व्यावसायिकांना तालुका स्तरावर कर्जवाटप केले आहे. सभासदांनी देखील आर्थिक शिस्तीचे दर्शन घडविल्यामुळे आम्ही 99% कर्जवसुली करू शकलो ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे.

आर्थिक स्थिती

३१/३/२०२५ ची आर्थिक स्थिती

ठेवी कर्ज वाटप नफा थक-बाकी एन
पी.ए.
ऑडीट
वर्ग
सिडी
रेशो.
ऑडीट
गुण
लाभांश
११,११,३६,२२१/- ७,४५,१९,६९४/- २२,३०,०००/- १% ०% ५२% ९२
१००
१४%
स्थापनेपासून सलग 'अ स्टार' व 'अ' ऑडीट वर्ग सभासदांसाठी "महात्मा फुले संजीवनी विमा" योजना RTGS / NEFT / IMPS सुविधा उपलब्ध कर्जाचा व्याज दर फक्त १२% सोने-चांदी कर्ज करीता व्याजदर १०%
आमच्या सेवा

आम्ही काय देतो

सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज

व्याजदर १०%

आपल्या सोन्याच्या दागिन्यांवर सुरक्षित आणि जलद कर्ज मिळवा.

गृहबांधणी कर्ज

गृहबांधणी कर्ज

व्याजदर १२%

स्वप्नातील घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी सुलभ गृहकर्ज.

नजरगहाण कर्ज

नजरगहाण कर्ज

व्याजदर १२%

व्यवसायातील मालावर किंवा यंत्रसामग्रीवर सुलभ नजरगहाण कर्ज सुविधा.

सामान्य कर्ज

सामान्य कर्ज

व्याजदर १२%

आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सुलभ आणि जलद सामान्य कर्ज उपलब्ध.

वाहनतारण कर्ज

वाहनतारण कर्ज

व्याजदर १२%

नवीन किंवा जुने वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षक व्याजदरात कर्ज.

मालतारण कर्ज

मालतारण कर्ज

व्याजदर १२%

आपल्या व्यवसायातील मालाच्या तारणावर त्वरित कर्ज उपलब्ध.

व्यावसायिक मॉर्गेज कर्ज

व्यावसायिक मॉर्गेज कर्ज

व्याजदर १२%

आपल्या मालमत्तेच्या तारणावर मोठ्या रक्कमेचे कर्ज मिळवा.

टर्म लोन

टर्म लोन

व्याजदर १२%

दैनंदिन गरज पुर्तीसाठी त्वरीत मिळणारे कर्ज

निरोगी, निकोप संस्था, समाजाची आर्थिक संपदा...